भिंगे व त्यांचे उपयोग

बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा

views

03:10
बहिर्गोल भिंगाद्वारे आपल्याला वस्तूची वास्तव प्रतिमा कशी मिळवता येते हे पाहूया. आकृतीत दाखविल्याप्रमाणे AB ही वस्तू 2F1 च्या पाठीमागे ठेवली आहे. B पासून निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा आपाती किरण BC अपवर्तनानंतर मुख्य नाभी F2 मधून CT या मार्गाने जातो. B पासून निघणारा व प्रकाशीय केंद्रातून जाणारा आपाती किरण BO हा अपवर्तनानंतर विचलित न होता OS मार्गाने जातो. तो CT या किरणाला B1 बिंदूत छेदतो, म्हणजेच B1 येथे B या बिंदूची प्रतिमा निर्माण होते. A हा बिंदू मुख्य अक्षावर असल्याने त्याची प्रतिमादेखील मुख्य अक्षावर तयार होईल. B1 च्या सरळ वर मुख्य अक्षावर A1 येथे A बिंदूची प्रतिमा तयार होईल. म्हणजेच A1B1 ही AB वस्तूची भिंगाच्या साहाय्याने निर्माण झालेली प्रतिमा आहे. यावरून वस्तू 2F1 च्या पलीकडे ठेवली असता वस्तूची प्रतिमा आपल्याला F2 आणि 2F2 च्या दरम्यान मिळते. तिचा आकार लहान असतो. तसेच ती वास्तव व उलट असते हे सिद्ध होते.