भिंगे व त्यांचे उपयोग

थोडे आठवा

views

04:31
मुलांनो, मागील इयत्तेत आपण पाहिले आहे की, गोलीय आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी म्हणजे तयार होणाऱ्या प्रतिमेसाठी चिन्ह संकेत असतात. चिन्हांचे संकेत:1) वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून मोजतात.2) प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात, तर डावीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋण मानतात.3) मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे (ऊर्ध्व अंतरे) धन असतात.4) मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली (अधो अंतरे) ऋण असतात. 5) बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन आणि अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते.