आर्थिक विकास

मिश्र अर्थव्यवस्था भाग 2

views

3:12
मिश्र अर्थव्यवस्था भाग 2: मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी व सार्वजनिक क्षेत्र या दोन्हींचे सहअस्तित्व असते. अधिकधिक उत्पादन आणि मोठया प्रमाणात लोकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असते. भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था यांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न या अर्थव्यवस्थेत केला जातो. नफ्याची प्रेरणा, म्हणजे लोककल्याणाबरोबर नफा मिळविणे, उपक्रमशीलता म्हणजे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवे उपक्रम राबविणे, सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, काळानुसार नियोजन या सर्व गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षित करून चालत नाही. या गोष्टींचा विचार होणे गरजेचे असते. या व्यवस्थेत देशाच्या हिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. व्यक्तीच्या हितापेक्षा देशहिताला महत्त्व दिले जाते. ज्या गोष्टीत एकदा भांडवल गुंतविल्यानंतर दीर्घकाळापर्यंत त्याचा फायदा मिळेल अशा विकासावर अधिक भर दिला जातो. उदा. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे, विमानतळ उभारणी ही सर्व क्षेत्रे भरपूर गुंतवणूक करून उशिरा फळ देणारी आहेत. अशा ठिकाणी खासगी उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत नाहीत. अशा वेळी भविष्याचा विचार करून सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. अशा पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे अवलंबन करून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. १९७३ च्या औद्योगिक धोरणामुळे विकासाची गती वाढली. या धोरणानुसार अवजड उद्योग म्हणजे लोहपोलाद उद्योग, वाहन निर्मिती उद्योग यांसारखे उद्योग, उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले.