आर्थिक विकास

पंचवार्षिक योजना

views

4:52
पंचवार्षिक योजना :- आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी भारतासमोर अनेक समस्या होत्या. पारतंत्र्यात असताना परकीय राजवटींनी भारताचे पुरेपूर शोषण केले होते. स्वस्तातील कच्चा माल आपल्या देशात नेऊन त्यावर प्रक्रिया करून अधिक किमतीने परत आपल्याच देशात विकला जात होता. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण, शिक्षणाच्या अभावाने दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंद्यातून कमी उत्पादन तसेच ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यासंबधीचे मागासलेपण अशा अनेक बिकट समस्या देशासमोर होत्या. त्या सोडविणे सोपे काम नव्हते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून प्रगती साधणे गरजेचे होते. आणि त्यासाठी नियोजनाची गरज होती. म्हणूनच, १९५० मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यांमध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी पाच वर्षांची योजना तयार केली. ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना’ होय. भारतीय नियोजन मंडळाने भारताच्या समस्यांचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणांचा अवलंब केला. भारत हा शेतीप्रधान आणि खेड्यांचा देश आहे. त्यामुळे कृषी व ग्रामीण विकासाला महत्त्व दिले गेले.