आर्थिक विकास

नवे आर्थिक धोरण

views

3:37
नवे आर्थिक धोरण :- आधुनिक भारताच्या इतिहासात १९९१ हे साल महत्त्वाचे आहे. दहाव्या लोकसभा निवडणुका योग्य प्रकारे पार पाडून काँग्रेस पक्षाने काठावर बहुमत प्राप्त केले. काँग्रेस पक्षातील नरसिंहराव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडलेली होती. त्यांनी ओळखले की, आता अर्थव्यवस्थेवर ऑपरेशन करण्यासाठी चांगल्या हुशार डॉक्टराची गरज आहे. तरच भारतीय अर्थव्यवस्था तग धरू शकेल. म्हणून त्यांनी रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ.मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री पद दिले. अर्थव्यवस्थेतील बदलांसाठी मनमोहन सिंग यांना पूर्ण राजकीय पाठिंबा नरसिंहरावांनी देऊ केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत काही मूलभूत स्वरूपाचे बदल घडविले व भारतीय अर्थव्यवस्थेला जगाच्या प्रवाहात आणले. याला ‘राव – मनमोहन ‘ विकासाचा नमुना’ असेही म्हटले जाते.