आर्थिक विकास

वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (जागतिक व्यापार संघटना) (WTO)

views

3:03
वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (जागतिक व्यापार संघटना) (WTO):- भारताने 1995 मध्ये वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे (WTO) चे सदस्यत्व स्वीकारले. या संघटनेची स्थापना जागतिक व्यापारात सुरळीतपणा आणण्यासाठी झाली होती. तिची उदिष्टे आपण पुढे पाहणारच आहोत. ही संघटना अस्तित्वात येण्यापूर्वी ‘गॅट’ करार अस्तित्वात होता. Gatt म्हणजे जनरल अॅग्रीमेंट ऑन टरिफ्स अँड ट्रेड. ही संकल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती. ती आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करायची. भारतात WTO च्या संदर्भात परस्परविरोधी टोकाची मते होती. असे असूनही भारताने WTO चे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला हे विशेष होय. WTO संघटनेची उद्दिष्टे :- .1.देशा – देशांमधील व्यापार खुला करणे. 2. आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधात भेदाभेद निर्माण करणारे धोरण नाहीसे करणे 3. जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. 4. सदस्य देशातील लोकांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न करणे. इत्यादी. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी अनुदाने, आयातनिर्यात, परकीय गुंतवणुकीसाठी संरक्षित क्षेत्रे, शेती तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. भारत या संघटनेचा सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राचे सार्वजनिक क्षेत्रातून झपाट्याने व्यापारीकरण झाले. जागतिक व्यापार संघटनेने वेळोवेळी दिलेल्या वेगवेगळ्या दिलेल्या अहवालांनुसार दारिद्य रेषेखालील लोकसंख्येतील घट, बालमृत्यू प्रमाणातील घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबतच्या सोईसुविधा, उपलब्धता यांत भारताने सुधारणा केल्या आहेत. जागतिक व्यापार संघटना ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे.