आर्थिक विकास

आठवी पंचवार्षिक योजना (१९९२-१९९७)

views

2:23
आठवी पंचवार्षिक योजना (१९९२-१९९७) :- या योजनेचा कालावधी १ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७ हा होता. या योजनेत सरकारी क्षेत्रापेक्षा खासगी क्षेत्राला महत्त्व देण्यात आले. या योजनेची उद्दिष्टे :- 1. राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ६.५% इतका राखणे. 2. लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणे. 3. कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे. 4. १५ ते ३५ या वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्यातील निरक्षरतेचे संपूर्ण उच्चाटन करणे. 5. कृषी क्षेत्राचा विकास करून अन्नधान्यांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणे. निर्यातीसाठी योग्य असा शेतमाल तयार करणे. 6. ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचनसोयी इ. सोई-सुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन भावी काळातील देशाच्या आर्थिक विकासाचा पाया भक्कम घालणे.