आर्थिक विकास

चौथी पंचवार्षिक योजना (१९६९-१९७४)

views

3:59
चौथी पंचवार्षिक योजना (१९६९-१९७४):- या योजनेचे घोषवाक्य स्वावलंबन हे होते. या योजनेत मूलभूत उद्योगांचा विकास सरकारने करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरविण्यात आले. २ जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा विचार करता ही योजना अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. १९७१ ला भारत – पाकिस्तान युद्धातून बांग्लादेशाची निर्मिती झाली. त्यामुळे पाकिस्तानमधून लाखो निर्वासित भारतात आले. त्यांच्यावरील खर्च भारताला सहन करावा लागला. रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, तसेच भारताला पहिला तेलाचा झटका बसला. पाचवी पंचवार्षिक योजना (१९७४-१९७९) :- या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख ध्येय द्रारिद्र्य निमूर्लन हे होते. म्हणजेच गरिबी दूर करून देश आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, आरोग्यविषयक वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागाला पुरविणे, ग्रामीण भागात वीजपुरवठा वा दळणवळणाची साधने पुरविण्यासाठी रस्ते बांधणे, समाजकल्याण खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना मोठया प्रमाणावर राबविणे, कृषी क्षेत्रात विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंद्यांची वाढ करणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून म्हणजे गहू, तांदूळ, रॉकेल, डाळी, खाद्यतेल इ. वस्तूंची खरेदी करून त्या सार्वजनिक वितरण संस्थाद्वारा म्हणजे स्वस्त धान्य दुकानांमधून उदा रेशन/शिधा वाटप केंद्र यातून गरिबांना रास्त किंमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आली आहेत. या पाचव्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्यनिवारण, रोजगार वाढविणे व स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश आले.