आर्थिक विकास

सहावी पंचवार्षिक योजना (१९८०-१९८५)

views

5:25
सहावी पंचवार्षिक योजना (१९८०-१९८५):- ही योजना १ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५ या कालावधीत राबविण्यात आली. या योजनेचा मुख्य भर दारिद्र्यनिमूर्लन आणि रोजगार निर्मिती यांवर होता. या योजनेची उददिष्टे पुढीलप्रमाणे होती: 1. अर्थव्यवस्थेच्या विकास दरात ५.२% इतकी लक्षणीय वाढ करणे. 2. गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे. ३ कोटी ४० लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती करणे. 3. आर्थिक व तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे. 4. छोटी कुटुंब पद्धती लोक स्वत: स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. वरील उद्दिष्टे या योजनेत साध्य करायची होती.