आर्थिक विकास

कामगार समस्या भाग २

views

1:58
कामगार समस्या भाग २:-संप सुरू झाल्यानंतर सुरवातीचे काही दिवस कामगारांना गावाकडून अन्नधान्य पुरवठा होऊ लागला. कामगार एकमेकांना मदत करू लागले. विभाग स्तरावरही समित्या स्थापन करून अन्नधान्य व मदत निधींचे वाटप केले. डाव्या पक्षांचा या संपाला पाठिंबा होता. संपाला ६ महिने पूर्ण झाले. संप रेंगाळायला लागला. कामगारांचा उत्साह संपला, त्यांना भविष्याची चिंता वाटू लागली. याचा फायदा घेऊन कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रत्यन सुरू झाले. मुलांनो जेव्हा काही प्रश्न राज्यशासनास सोडविता येत नाहीत तेव्हा केंद्र शासन त्यात लक्ष घालते. परंतु अडीच लाख कामगारांचा प्रश्न असूनही केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. कामगारांनी ‘जेल भरो आंदोलन’ सुरू केले. कायद्याचा भंग करून अनेक कामगारांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. सप्टेंबर १९८२ मध्ये मुंबईतील महाराष्ट्राच्या विधानसभेवर दीड लाख कामगारांचा मोर्चा गेला. त्याचाही काही उपयोग झाला नाही. संपाला एक वर्ष पूर्ण झाले. दीर्घकाळ चाललेला हा पहिलाच ऐतिहासिक संप होता. या कालावधीत सुमारे दीड लाख कामगार बेकार झाले. गिरणीत तयार होणाऱ्या कापडापेक्षा पॉलिएस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कापडाच्या विक्रीवर परिणाम झाला होताच. त्यातून मुंबईतील कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये हलविण्यात आल्या. केंद्र सरकारने १३ गिरण्यांचे राष्ट्रीयीकरण केले. समस्या सोडविण्यासाठी लवाद नेमले गेले. पण त्यांना यश मिळाले नाही.