आर्थिक विकास

कामगार समस्या भाग १

views

2:43
कामगार समस्या भाग १:- ११ जुलै १८५१ रोजी मुंबईत देशातील पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. पुढे मुंबईतील दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग कापडगिरण्यांमुळे ‘गिरणगाव’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या कापड गिरण्यांमध्ये काम करणारा कामगार गिरणी कामगार म्हणून ओळखला जात होता. ८० च्या दशकात या गिरणी कामगारांमध्ये गिरणी मालकांविरुद्ध असंतोष, राग निर्माण झाला होता. त्याला अनेक कारणे होती. अन्य क्षेत्रांतील काही उद्योगांत कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. तसेच गिरणी कामगारांपेक्षा त्यांना इतर काही जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. १९८१ च्या दिवाळीत कामगारांना २०% बोनसची अपेक्षा होती. परंतु त्यांना तेवढा बोनस देण्यास गिरणी मालकांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे गिरण्यातील कामगारांनी संप पुकारला. कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता ८ ते १७% वर तडजोड केली. त्यावेळी काही कामगार थेट डॉ. दत्ता सामंत यांच्या घाटकोपर येथील कार्यालयात गेले. त्यांनी सामंतांना विनंती केली की, त्यांनी कामगाराचे नेतृत्व स्वीकारावे. केवळ बोनसच्या मागणीसाठी संप न करता ६५ कापड गिरण्यांतील अडीच लाख कामगारांना भरगच्च पगारवाढ व इतर फायदे मिळावेत म्हणून १८ जानेवारी १९८२ रोजी या दिवसापासून संप पुकारण्यात आला. संपाला गिरणी कामगारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. गिरण गावची धडधड थांबली जणू मुंबईचे हदयच बंद पडले