पर्यावरणीय व्यवस्थापन

घनकचऱ्याचे स्त्रोत

views

05:34
घनकचऱ्याचे विविध स्त्रोत कोणते आहेत ते या तक्त्याच्या मदतीने समजून घेऊ. घरगुती कचरा :- स्वयंपाकघरातील वाया गेलेले अन्न, टाकाऊ कागद, प्लास्टिक कागद, पिशव्या, भाज्यांचे देठ, फळांच्या साली, पत्र्याच्या वस्तू, काचेच्या वस्तू इत्यादी. अशा अनेक प्रकारचा कचरा आपल्या घरात निघत असतो. औद्योगिक कचरा :- विविध उद्द्योगांतून विविध प्रकारची रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ, धातू असा कचरा बाहेर पडतो. धोकादायक कचरा :- विविध उद्द्योगातून निर्माण होणारी रसायने, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके, रोगप्रसारक पदार्थ इत्यादी प्रकारचे पदार्थ मानवी जीविताला व पर्यावरणाला धोका निर्माण करणारे असतात. शेतातील/बागेतील कचरा :- झाडांची पाने, फुले, फांद्या, शेतातील पिकांचे अवशेष, जनावरांचे मल – मूत्र, विविध रसायने व खते यांचे अवशेष. इलेक्ट्रॉनिक कचरा :- आपण वापरून खराब झालेला इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे टेलीव्हिजन संच, मोबाईल फोन्स, संगणक व त्याचे भाग असा विविध प्रकारचा कचरा हा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये मोडतो. जैव वैद्यकीय कचरा :- दवाखाने, हॉस्पिटल यामधून निघणारे इंजेक्शन, सलाईन बाटल्या, बँडेजेस, कापूस, औषधे, औषधांच्या बाटल्या, सुया, हातमोजे, नळ्या, मानवी अवयवांचे भाग असा अनेक प्रकारचा कचरा हा जैव वैद्यकीय कचऱ्यात मोडतो. शहरी कचरा :- घरगुती कचरा, औद्योगीक व व्यापारी उद्द्योगांद्वारे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ, दुकाने, भाजीमार्केट, मटणमार्केट इत्यादीमधील कॅरीबॅग, काच, धातूचे तुकडे व साली, धागे, रबर, कागद, डबे व इमारतीच्या बांधकामातील टाकाऊ पदार्थ. असा अनेक प्रकारचा कचरा शहरी भागात तयार होतो. आण्विक कचरा :- अणूविद्युत केंद्र, युरेनिअमच्या खाणी, अणुसंशोधन केंद्रे, आण्विक अस्त्र चाचणीची ठिकाणे येथून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ जसे स्टॉ̭न्शिअम – 90, सिरिअम 141, बेरीअम–140 व या प्रक्रियेतून बाहेर सोडलेले जड पाणी यांचा समावेश आण्विक कचऱ्यात होतो. खनिज कचरा :- विविध खाणींतून निघणारे शिसे, आर्सेनिक, कॅडिअम अशा जड धातूंचे अवशेष हे खनिज कचऱ्यामध्ये मोडतात. अशा स्रोतांतून घनकचरा निर्माण होतो. मुलांनो, या सर्व टाकाऊ पदार्थांचे दोन गट तयार करता येतील. ते म्हणजे विघटनशील कचरा व अविघटनशील कचरा.