पर्यावरणीय व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्त्वे

views

02:30
आता आपण घन कचरा व्यवस्थापनाची 7 तत्त्वे समजून घेऊ.. पुनर्वापर :- घनकचऱ्यामध्ये ज्या वस्तू आपण पुन्हा वापरात आणू शकतो, अशा वस्तूंचा वापर इतर ठिकाणी योग्य कामासाठी केला पाहिजे. त्यामुळे घनकचऱ्याचे प्रमाण कमी होते. उदा. रिकाम्या डब्या-बाटल्यांचा पुनर्वापर वेगळ्या कामासाठी केल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होते. वापर नाकारणे :- प्लास्टिक व थर्मोकोल अशा वस्तूंचे विघटन होत नाही. त्यामुळे आपण या वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. चक्रीकरण :- टाकाऊ पदार्थांपासून पुनर्चक्रीकरण पद्धतीने प्रक्रिया करून उपयुक्त पदार्थ बनवले पाहिजे. उदा. कागद, काच. वर्तमानपत्राच्या रद्दीपासूनपुन्हा लगदा बनवून परत काग्द्द केला जातो. पुनर्विचार :- दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार केला पाहिजे. उदा. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगऐवजी कापडी पिशवी वापरणे. समारंभात कागदी बशा, प्लॅस्टिकचे पेले वापरण्याऐवजी स्टीलच्या बशा पेले वापरल्यास कचरा कमी होतो. वापर कमी करणे :- साधनसंपत्ती वाया जाईल अशा वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे. जुन्या वस्तूंचा वापर पुन्हा केला पाहिजे. अनेक जणांनी मिळून एकाच वस्तूचा वापर केला पाहिजे. वापरा व फेका म्हणजेच use and throw अशा स्वरूपाच्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. संशोधन: तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील याचे संशोधन करावे. नियमन/जनजागृती :- कचरा व्यवस्थापन करण्यासाठी जे कायदे किंवा नियम घालून दिलेले आहेत ते स्वतः पाळले पाहिजेत, व इतर लोकांनाही ते पाळण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. उदा. ओला – सुका कचरा वेगळा करणे, रस्त्यावर कचरा न फेकणे. अशाप्रकारे ही घनकचऱ्याची 7 तत्त्वे आपले पर्यावरण सुस्थितीत ठेवण्यास मदत करतात.