पर्यावरणीय व्यवस्थापन

कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी

views

03:40
आता आपण या घनकचऱ्याच्या विघटनाला किती कालावधी लागतो ते या तक्त्यातून समजून घेऊ. आपल्या आजूबाजूला घनकचरा साचून राहिला तर त्याचा मानवी जीवनावर व पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होतो. या घनकचऱ्याचे विघटन जितके लवकर होईल तितके पर्यावरण व मानवी जीवन सुस्थितीत राहील. पदार्थ निसर्गतः विघटनासाठी लागणारा वेळ. केळ्याची साल 3 ते 4 आठवडे कागदी पिशवी 1 महिना कपड्याच्या चिंध्या 5 महिने लोकरी पायमोजे 1 वर्ष लाकूड 10 ते 15 वर्ष चामडी बूट 40 ते 50 वर्ष जस्ताचे डबे 50 ते 100 वर्ष अॅल्युमिनियमचे डबे 200 ते 250 वर्ष विशिष्ट प्लास्टिक पिशवी 10 लाख वर्ष थर्मोकोल (स्टायरोफोम) अनंतकाळ या तक्त्यावरून आपल्या लक्षात येते की काही पदार्थ हे कित्येक वर्ष विघटित होत नाहीत. त्यामुळे तुम्हीच कल्पना करा की पर्यावरणावर त्याचा किती वाईट परिणाम होत असेल. पर्यावरणावर याचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. मग सांगा बरं पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल