पर्यावरणीय व्यवस्थापन

आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांना प्रथमोपचार

views

04:16
आता आपण आपद्ग्रस्तांना प्रथमोपचार कसे दयावेत हे समजून घेऊ.जखमी झालेल्या आपद्ग्रस्तांवर प्राथमिक स्वरुपात जे उपचार केले जातात, त्यालाच ‘प्रथमोपचार’ असे म्हणतात. प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश म्हणजे प्राणहानी टाळणे, प्रकृती अधिक बिघडू नयेम्हणून काळजी घेणे. तसेच प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे हा असतो. म्हणून प्रथमोपचार किंवा तातडीने करायच्या उपाययोजना कोणत्या असतात हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आपण प्रथमोपचाराची मूलतत्त्वे समजून घेऊ.प्रथमोपचाराची मूलतत्त्वे पुढील प्रमाणे आहेत. 1) श्वसनमार्ग :- आपद्ग्रस्तांना श्वास घ्यायला जर अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा रुग्णांच्या हनुवटीला वर उचलावे कारण त्यामुळे श्वसननलिका खुली राहते व आपद्ग्रस्तांना श्वास घेण्यास सहजता होते. 2) श्वासोच्छ्वास :- जर श्वासोच्छ्वास बंद झाला तर आपद्ग्रस्तांना तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. 3) रक्ताभिसरण :- जर आपद्ग्रस्त व्यक्ती बेशुद्ध पडली असेल, तर त्या व्यक्तीला दोनदा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. त्यानंतर हाताच्या दोन तळव्यांनी त्या व्यक्तीच्या हृदयावर जोराचा दाब देऊन सोडून द्यावे. ही प्रक्रिया जवळपास 15 वेळेस करावी. त्यामुळे त्या व्यक्तीची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. या प्रक्रियेलाच CPR असे म्हणतात. CPR म्हणजेच (Cardio – Pulmonary Resuscitation)