पर्यावरणीय व्यवस्थापन

हवामानाचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम

views

4:53
‘हवा’ म्हणजे एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेली वातावरणाची स्थिती होय.” याउलट वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला ‘हवामान’ म्हणतात.एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीत काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे ‘प्रादेशिक’ हवामान होय.निसर्गातील हवामान हे सतत बदलत नाही. सतत बदल होतो तो हवेमध्ये,यावरून आपल्या असे लक्षात येते की हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. तर हवामानाचा संबंध मोठया प्रदेशाशी व मोठया कालावधीशी संबंधित असतो. हवेमध्ये कमी काळात बदल होतो. उदा. आज जर हवेत गारवा असेल तर थोडया दिवसांनी हवेतील गारवा कमी होतो. हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. उदा. थंड हवेच्या ठिकाणाचे हवामान सहसा बदलत नाही. हवामान आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, व्यवसाय इत्यादींवर हवामानाचा परिणाम होत असतो. उदा. जास्त थंडी असेल त्या प्रदेशातील लोक लोकरीचे कपडे वापरतात. तसेच थंड वातावरणात जी पिके येतात त्या पिकांची शेती करतात. त्यांच्या घरांची रचनाही विशिष्ट प्रकारची असते., हवामानाचा अनेक गोष्टींवर परिणाम होतो. जर शेतीसाठी योग्य प्रमाणात पाऊस पडला तर पीक भरपूर येईल. पण जर पाऊसच पडला नाही तर दुष्काळ पडेल आणि उपासमार होईल. हवामानातील बदलामुळे सागर प्रवाहावर परिणाम होऊन वादळे, चक्रीवादळे, ढगफुटी, त्युनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. वाढत्या तपमानामुळे हिमनग वितळून समुद्रजल पातळी वाढते. हे असे अनेक परिणाम होतात. हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी आपण प्रदूषण टाळायला पाहिजे. वृक्षतोड थांबवून अधिकाधिक वनराई निर्माण करायला पाहिजे. तसेच कार्बनचे उत्सर्जन कमी करायला पाहिजे.सर्व जगाला हवामानाचे महत्त्व लक्षात यावे. हवामानाविषयी त्यांच्या मनात जागरूकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी ‘23 मार्च’ हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन’ म्हणून साजरा केला जतो.