पर्यावरणीय व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपली मदत

views

03:39
काही कृती केल्याने घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपलीही मदत होऊ शकते.1.घनकचरा व्यवस्थापनामध्ये 3R मंत्राचा म्हणजेच Reduce = कचरा कमी करणे, Reuse = कचऱ्याचा पुनर्वापर करणे आणि Recycle = कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण यांचा अंगीकार करायला पाहिजे.2.चॉकलेट, बिस्किटे, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थाचे प्लास्टिकचे आवरण मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर न टाकता ते कचराकुंडीतच टाकावे.3.आपण प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी प्लास्टिकच्या पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशवी, घरगुती जुन्या साड्यांपासून, जुन्या बेडशीट, पडदे यापासून पिशव्या बनवून वापरल्या पाहिजेत.4.कागदांच्या दोन्ही बाजूंवर म्हणजेच पाठपोट लिहिले पाहिजे. तसेच ग्रीटिंग कार्ड्स, गिफ्ट पेपर यांचा वापर पुन्हा – पुन्हा केला पाहिजे.5.टिश्यू पेपरचा वापर कमी करून त्याऐवजी हातरुमालाचा वापर जास्त केला पाहिजे.6.शिसेयुक्त बॅटरी म्हणजेच सेल ऐवजी रीचार्जेबल बॅटरीचा वापर केला पाहिजे.7.घनकचरा व्यवस्थापनात आपण स्वतः, कुटुंब व समाजातील लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांचे विविध प्रकारे कार्यक्रम राबवून लोकांचे प्रबोधन केले पाहिजे.8.Use & throw म्हणजेच वापरा आणि फेका अशा वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. उदा. शीतपेयांचे कॅन्स, बॉटल, पेन, द्रोण, थर्माकोल डीश-ग्लास इत्यादी वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. अशाप्रकारे घनकचऱ्याची समस्या सोडवायची असेल तर वरील मंत्राचा आपण सर्वांनी अंगीकार केला पाहिजे.