पर्यावरणीय व्यवस्थापन

प्रस्तावना

views

03:21
पृथ्वीच्याभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. दैनंदिन जीवनात हवेचा आणि पर्यावरणातील विविध घटकांचा सजीव सृष्टीवर परिणाम होत असतो. एखाद्या ठिकाणची वनस्पतींची वाढ, तसेच एखादया ठिकाणच्या लोकांचे आहार, वेशभूषा, शरीराची ठेवण इत्यादी गोष्टी ह्या पर्यावरणातील विविध घटकांवर अवलंबून असतात. म्हणूनच काश्मिरी लोक व राजस्थानी लोक यांच्या राहणीमानात, अन्न, वस्त्र, निवारा यांमध्ये फरक दिसून येतो. पर्यावरणाचा सजीव सृष्टीवर जसा चांगला परिणाम होतो तसाच वाईट परिणाम देखील होत असतो. पर्यावरणाच्या घटकांविषयी आपल्याला माहिती असायला हवी. विविध घटकांचा अभ्यास करून आपण ही माहिती अद्दययावत ठेवायला पाहिजे. कारण पर्यावरणातील घटकांमध्ये सातत्याने बदल होत असतो. पर्यावरणातील या घटकांच्या बदलत्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी विविध संस्थाही कार्यरत आहेत. पर्यावरणाचे व्यवस्थापन ही आज काळाची गरज बनली आहे. वातावरणामध्ये जे बदल होतात ते पर्यावरणामध्ये योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे होतात. म्हणून आपण या पाठामध्ये पर्यावरणाच्या व्यवस्थापनाविषयी माहिती अभ्यासणार आहोत.