गतीचे नियम

चाल व वेग

views

4:48
आपण वस्तूची चाल व वेग यामधील फरक काय असतो ते समजून घेऊ. चाल व वेग ह्यामध्ये फरक असला तरी ह्या दोन्ही राशी एकमेकांना पूरक आहेत. जी भौतिक राशी व्यक्त करण्यासाठी दिशा व परिमाण या दोन्हींची आवश्यकता असते. अशा भौतिक राशीस ‘सदिश’ राशी असे म्हणतात. आणि जी भौतिक राशी केवळ परिमाण दिल्याने व्यक्त होते त्या राशीस ‘अदिश’ राशी असे म्हणतातएकक कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. कापलेले एकूण अंतरचाल = लागलेला एकूण कालावधी आता आपण वेग या राशीविषयी माहिती घेऊ या. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग असे म्हणतात. “एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात.” तर वेग काढण्यासाठी या सूत्राचा उपयोग केला जातो. वेग=(विस्थापन)/(वेळ)