गतीचे नियम

चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम

views

2:40
आता आपण चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम याविषयी समजून घेऊ या. समजा सचिन प्रवास करत असताना त्याने मोटारसायकलच्या प्रवासाची दिशा न बदलता मोटारसायकलची चाल वाढवली किंवा कमी केली तर त्याच्या मोटारसायकलीच्या वेगावर काय परिणाम होईल? मोटारसायकलची दिशा न बदलता सचिनने चाल वाढवली तर मोटारसायकलचा वेग वाढेल. त्याने चाल कमी केली तर मोटारसायकलचा वेग कमी होईल. वस्तूची चाल बदलली व दिशा तीच ठेवली, तर वेगावर परिणाम होतो. म्हणजेच वेग कमी जास्त होतो. तसेच दिशा बदलून चाल तीच ठेवली तर वेग कमी होतो. तसेच वस्तूची चाल व गतीची दिशा बदलली तर वस्तूच्या वेगात बदल होतो. थोडक्यात वेगावर चाल व दिशा यांच्यानुसार बदल होतो.