गतीचे नियम

एकसमान गतीकरिता वेग – काल आलेख

views

3:55
आपण एकसमान त्वरणीत गतीकरिता वेग – काल आलेख कसा काढायचा ते पाहू. ठरावीक कालावधीमध्ये एका कारच्या वेगात होणारे बदल दिले आहेत. या आलेखाच्या सारणीमध्ये काल सेकंदांमध्ये व वेग मी/से मध्ये दिला आहे. सारणीमध्ये दिल्या प्रमाणे वेगामध्ये समान बदल होत आहे. हा वेग त्वरणीत आणि एकसमान आहे हे या आलेखावरून स्पष्ट होते. यात प्रत्येक 5 सेकंदात वेगात 8 मी/सेकंद इतका बदल होत आहे. या आलेखावरून आपल्याला समजते की, सर्व एकसमान त्वरणीत गतीसाठी वेग – काल आलेख हा सरळ रेषा असतो. परंतु नैकसमान गतीसाठी वेग – काल आलेख हा वेळेनुसार त्वरणात होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. आता आपण आलेखात दिलेल्या माहितीवरून कारने पार केलेले अंतर कसे काढावे ते पाहूया. कारचा वेग हा स्थिर नाही. एकसमान त्वरणामुळे सतत बदलत आहे. कारने 10 सेकंद ते 20 सेकंद या कालावधी दरम्यान कापलेले अंतर काढण्यासाठी कारचा सरासरी वेग काढू. कारचा सरासरी वेग (32+16 )/(2 )= 24 मीटर/सेकंद आहे. आपल्याला कारचा सरासरी वेग मिळाला. आता आपण कारने कापलेले अंतर काढूया. कारने कापलेले अंतर = सरासरी वेग × कालावधी. = 24 मी/सेकंद × 10 सेकंद. = 240 मी. म्हणजेच कारने एकूण 240 मी. अंतर पार केलेले आहे.