गतीचे नियम

न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम

views

3:27
आता आपण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पाहू. एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व वेग या दोन्हींवर अवलंबून असतो. म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो. या गुणधर्मालाच न्यूटनने ‘संवेग’ असे म्हटले आहे. “संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.” उदा. हातोडीने आपण खिळा भिंतीत ठोकतो त्यावेळेस खिळ्यावर जो आघात होतो त्या आघातामुळे खिळा भिंतीमध्ये घुसतो.