गतीचे नियम

एकरेषीय एकसमान व नैकसमान गती

views

3:19
गतीचे एकरेषीय एकसमान गती व नैकसमान गती असे प्रकार आहेत तर आता आपण त्यांची माहिती करून घेऊ या. एकरेषीय एकसमान गती :- तुम्ही मुंग्यांची रांग पाहिली असेल, मुंग्या एकामागे – एक रांगेने चालत असतात. अशाप्रकारे “एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती असे म्हणतात.” आपण टीव्हीवर सैनिकांचे संचलन होत असताना पाहतो. त्यातील प्रत्येकाची गती ही एकसारखीच असते. त्या सैनिकांच्या गतीमध्ये थोडाही फरक जाणवत नाही. म्हणजेच जर एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात. एकाच गतीने फिरणारा पंखा, पृथ्वीचे सूर्याभोवती भ्रमण, चालू रेल्वेगाडी, ही सुद्धा एकसमान गतीची उदाहरणे आहेत. नैकसमान गती :- मुलांनो रस्त्यावरील ट्रॅफिकमधून गाडी चालवत असताना त्या गाडीची गती कधी वाढते तर कधी कमी होत असते. तसेच तुम्ही घसरगुंडी पाहिली असेल. घसरगुंडीवरून खाली येताना गतीचा वेग कमी अधिक होत असतो. म्हणजे सुरुवातीला वेग कमी असतो, मध्ये तो वाढतो व शेवटी तो कमी होऊन शून्य होतो. तर एखादी वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती” असे म्हणतात.