गतीचे नियम

संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत

views

6:03
“एकूण अंतिम संवेगाचे परिमाण = एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण” असतात. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. “दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर बाह्य बल कार्यरत नसले तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो. तो बदलत नाही.” हा सिद्धांत हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमांचा उपसिद्धांत आहे. वस्तूंमध्ये टक्कर झाल्यानंतरही त्या वस्तूचा संवेग स्थिर राहतो. ज्या वस्तूंमध्ये टक्कर होते त्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वितरित होतो. म्हणजे पुन्हा त्या वस्तूंमध्ये संवेग तयार होतो. म्हणजेच एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला असतो. “जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.” उदा. बंदुकीतून मारलेली गोळी.