गतीचे नियम

न्यूटनचे गतीविषयक नियम

views

4:47
आता आपण न्यूटनचे गतीविषयक नियम काय आहे ते समजून घेऊ या. सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने ‘The pricipia mathematica’ या त्याच्या ग्रंथामध्ये गतीविषयक नियम प्रसिद्ध केले आहेत. हेच नियम “न्यूटनचे गतीविषयक नियम” म्हणून ओळखले जातात आपण नेहमीच पाहतो की एखादी वस्तू स्थिर असेल तर बल लावल्याशिवाय ती वस्तू जागची हलत नाही. टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी जेवढे बल पुरेसे असते, तेवढयाच बलाद्वारे आपण टेबल उचलू शकत नाही. झाडाची फांदी हलवली की झाडावरची फळे खाली पडतात. किंवा विजेवर चालणारा पंखा, बंद केल्यानंतरही काही वेळ फिरतच राहतो. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर या सर्व वस्तूंमध्ये जडत्व हा गुणधर्म असल्याचे आपल्याला दिसून येते. वस्तू ही स्थिर राहते कारण वस्तूमध्ये ‘जडत्व’ हा गुणधर्म असतो. म्हणजेच वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी संबंधित असते. न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम हा ‘जडत्वाचा नियम’ आहे. “जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते.”