गतीचे नियम

एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे

views

4:41
एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा कशी काढायची ते पाहू. एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा याचे उदाहरण पहायचे असेल तर घड्याळ हे एक उदाहरण आहे त्यातील सेकंद काटा याचे निरीक्षण केले असता त्या काट्याच्या टोकाची चाल सतत स्थिर असते. परंतु त्याची विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असल्याने त्याचा वेग मात्र सतत बदलत असतो. कारण काटा वर्तुळाकार मार्गाने फिरतो. 3:00 वाजता काटा एका जागेवर असतो. तर 3:17 मिनिटांनी काट्याची दिशा बदलते. म्हणूनच आपण म्हणतो की, त्याची विस्थापनाची दिशा बदलते. सेकंद काट्याचे टोक वर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. यावरून असे समजते की, “जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते. तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात”.