गतीचे नियम

त्वरण

views

3:55
आता आपण ‘त्वरण’ म्हणजे काय ते समजून घेऊ. “एकक कालावधीत वेगात होणारा बदल म्हणजेच त्वरण होय.” त्वरण =(वेगातील बदल )/( काल ) जर u हा सुरुवातीचा वेग, t या कालावधी नंतर बदलून अंतिम वेग V होत असेल तर. त्वरण =(अंतिम वेग – सुरुवातीचा वेग )/( काल ) म्हणजेच a =(v-uuuu )/( t ) आहे. त्वरण काढण्यासाठी अंतिम वेगातून सरुवातीचा वेग वजा करावा लागेल व त्या वेगाला वेळेने भागावे लागेल. मुलांनो जर एखादी गतिमान वस्तू ठरावीक कालावधीमध्ये वेग बदलत असेल तर वस्तूच्या त्या गतीला त्वरणीत गती असे म्हणतात. गतिमान वस्तूमध्ये दोन प्रकारचे त्वरण असते. ते म्हणजे, एकसमान त्वरण आणि नैकसमान त्वरण. जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असेल तर एकसमान त्वरण होते. उदा. झाडावरून खाली पडणारे फळ नैकसमान त्वरण :- जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असेल तर नैकसमान त्वरण होते. उदा. गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवणे.