वर्गसमीकरणे

प्रस्तावना

views

5:46
यामध्ये बहुपदीचे कोटीवरून होणारे प्रकार आपण अभ्यासले. एका चलातील ज्या बहुपदीची कोटी एक असते तिला रेषीय बहुपदी आणि जिची कोटी दोन असते तिला वर्गबहुपदी म्हणतात. खालील बहुपदींचे रेषीय बहुपदी व वर्गबहुपदी असे वर्गीकरण करा. 5 x +9, x 2+3 x -5, 3 x 2- 5 x, 3 x – 7, 5 x 2. वरील उदाहरणांपैकी 1 व 3 या क्रमांकांच्या उदाहरणांतील बहुपदीची कोटी 1 आहे. म्हणून त्या रेषीय बहूपदी आहेत. आणि 2, 4 व 5 या उदाहरणांतील बहुपदीची कोटी 2 आहे. म्हणून त्या वर्गबहूपदी आहेत. वर्ग बहूपदीची किंमत 0 घेवून जे समीकरण मिळते, त्या समीकरणाला वर्गसमीकरण म्हणतात. दैनंदिन जीवनात अनेक वेळा आपण या समीकरणांचा वापर करतो. खालील पैकी कोणती समीकरणे वर्गसमीकरणे आहेत ते नीट समजून घेवू: 1) 3 x2 = -5 x + 3 = 0 या समीकरणात x हे एक चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे वर्गसमीकरण आहे. 2) 9y2 + 5 = 0 या समीकरणात y हे एक चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे वर्गसमीकरण आहे. 3) m3 – 5m2 + 4 = 0 या समीकरणात m हे एकच चल आहे. परंतू चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे. म्हणून हे वर्गसमीकरण नाही.