वर्गसमीकरणे

उदाहरण 2

views

3:19
हे समीकरण आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. पूर्ण वर्ग पद्धती आणि अवयव पद्धती. तर प्रथम आपण पूर्ण वर्ग पद्धतीने हे गणित सोडवू. x2 + 8x - 48 = 0 याठिकाणी -48 ला बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेस घेऊ. म्हणून x2+ 8x = 48 झाले व त्याचे चिन्ह बदलले. आता आपण तिसरे पद शोधू. तिसरे पद शोधण्यासाठी (1/2 x x चा सहगुणक)2 हे सूत्र वापरू. x चा सहगुणक 8 आहे म्हणून, (1/2 × 8)2 = (8/2)2 (2 ने 8 ला भाग देवू. 4 उत्तर मिळेल. म्हणून 4 चा वर्ग (4)2=16 झाले. हे 16 दोन्ही बाजूंत मिळवू ∴ x 2+ 8x +16 = 48 + 16 (x 2+ 8 x +16 याची एक सोपी पद्धत लक्षात ठेवू. (पहिल्या संख्येचे वर्गमूळ, दुसऱ्या संख्येचे चिन्ह व तिसऱ्या संख्येचे वर्गमूळ.) येथे पहिली संख्या x आहे म्हणून x चे वर्गमूळ काढू. नंतर अधिकचे चिन्ह आहे ते देवू व 16 चे वर्गमूळ काढून त्याचा वर्ग करू. आणि 48 व 16 यांची बेरीज करू.) ∴ (x + 4)2 = + 64 (आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू.) ∴ (x + 4) = ±8 (64 चे वर्गमूळ 8 आहे.) ∴ (x + 4) = 8 किंवा (x + 4) = - 8 ∴ (x + 4) = 8 ∴ x = 8 - 4 = 4 तसेच (x + 4) = -8 ∴ x = - 8 - 4 = -12 म्हणून x = 4 किंवा x = -12 ही या वर्गसमीकरणाची मुळे आहेत.