वर्गसमीकरणे

अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे

views

5:45
आता आपण अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे कशी काढतात ते पाहूया. आपण चलाला वेगवेगळ्या किंमती देवून वर्गसमीकरणाची मुळे ठरवली, परंतू ही खूप वेळ लागणारी पद्धत आहे. म्हणून या भागात वर्गसमीकरणाची मूळे अवयव पद्धतीने काढण्याचा अभ्यास करणार आहोत. x2 - 4x – 5 = x 2 - 5x + 1 x – 5 = x (x - 5) + 1(x -5) = (x -5) (x +1) वरील उदाहरणात स्थिर पद 5 आहे. म्हणून 5 चे अवयव पाडून घेतले. 5 चे अवयव असे पाडले की त्यांची वजाबाकी 4 आली. 5 मधून 1 वजा केले असता वजाबाकी 4 येते. म्हणून 5 व 1 हे अवयव घेतले. उदाहरणात 4 चे चिन्ह वजा आहे. म्हणून 5 या संख्येसही वजा चिन्ह दिले. आता त्याचे दोन गट पाडले. ते दोन गट (x -5) (x +1) असे तयार झाले. यातील (x2 - 5x ) यामध्ये x हे पद समान आहे. म्हणून x कंसाच्या बाहेर घेतले. आणि (1x - 5) यातून 1 हे समान आहे म्हणून 1ला कंसाच्या बाहेर घेतले. तर (x -5) (x +1) हे अवयव मिळाले. येथे (x -5) (x +1) हे वर्गबहुपदी x 2 - 4x – 5 चे दोन रेषीय अवयव आहेत. म्हणून x2 - 4x – 5 या वर्गबहुपदीपासून मिळणारे x 2 - 4x – 5 = 0 हे वर्गसमीकरण खालील प्रकारे लिहता येईल.