लोकसंख्या

प्रस्तावना

views

4:06
जगाचा विचार केला तर जगात लोकसंख्येच्या बाबतीत चीनचा प्रथम क्रमांक लागतो. तर दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे. कधी लोकसंख्येची वाढ होते, तर कधी लोकसंख्या कमी होते. यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. तसेच लोकसंख्या ही अनेक प्रकारची असते. या सर्व लोकसंख्येशी संबंधित बाबींचा अभ्यास आपण आज या पाठात करणार आहोत. आपण आपल्या शाळेतील किंवा वर्गातील विद्यार्थी संख्या मिळवितो, तशाच प्रकारे आपण गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि संपूर्ण जगाची लोकसंख्याही मिळवू शकतो. ही माहिती मिळवताना वय, लिंग संरचना, साक्षरता इत्यादींचा विचार करावा लागतो. लिंग संरचना म्हणजे स्त्री-पुरुष प्रमाण साक्षरता म्हणजे एखाद्या प्रदेशातील एकूण लोकसंख्येंपैकी किती लोक साक्षर आहेत याचे प्रमाण होय. हे प्रमाण टक्केवारीत सांगितले जाते. मुलांनो, एखाद्या प्रदेशाचा विकास होण्यासाठी अनेक घटक उपयोगी असतात. उदा. पाणी, मृदा, नैसर्गिक वनस्पती, खनिजे यांसारख्या घटकांचा उपयोग प्रदेशाचा विकास होण्यासाठी होतो. तसेच लोकसंख्याही एखाद्या प्रदेशाचा विकास होण्यासाठी कारणीभूत ठरत असते.