लोकसंख्या

लोकसंख्येचे वितरण

views

4:34
आता आपण लोकसंख्येचे वितरण याविषयी जाणून घेऊ. त्यासाठी पुढील प्रयोग करू. चवळीचे 100 दाणे घ्या. हे दाणे प्रथम 30 × 30 सेमी आकाराच्या चौरसात पसरून टाका. आता आणखी 100 दाणे घ्या व ते 15 × 15 सेमी चौरसात पसरून टाका. मुलांनो, हे दाणे पसरताना ते एकमेकांवर येणार नाहीत याची काळजी घ्या. या प्रयोगात आपण काय केले, तर दाण्यांची 100 ही संख्या तेवढीच ठेवली. परंतु, चौरस लहान केला म्हणजे निम्मा केला. ज्याप्रमाणे चवळीचे दाणे वेगवेगळे आकारमान असलेल्या दोन क्षेत्रात विखुरले असता, मोठ्या क्षेत्रात (30 x 30 चा चौरस) वितरण विरळ दिसते तर कमी आकारमानाच्या क्षेत्रात (15 x 15 च्या चौरसात) वितरण दाट दिसते. अशाच प्रकारे प्रदेशाच्या लोकसंख्येचे असते. एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या त्या प्रदेशांत कशा रीतीने विखुरलेली आहे हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या वितरणावरून समजते. मुलांनो, सर्वच ठिकाणी प्रदेशाचे स्वरूप सारखे असत नाही. उदा. काही ठिकाणी पर्वत तर काही सपाट मैदान असते. पर्वत असलेल्या प्रदेशात खडतर परिस्थिती असते. त्यामुळे तेथे लोकसंख्या कमी असते. तर सपाट मैदानी प्रदेशातील जीवन हे सुखदायी असते. त्यामुळे तेथे लोकसंख्या जास्त असते. तसेच प्रदेशां–प्रदेशांमधील भौगोलिक परिस्थिती भिन्न – भिन्न असते. काही विभाग साधनसंपत्तीने संपन्न असतात, तर काही प्रदेशात साधनसंपत्ती मर्यादित स्वरुपात असते.