लोकसंख्या Go Back लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक views 2:22 लोकसंख्येच्या वितरणावर प्रामुख्याने पुढील चार घटक परिणाम करतात. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे मुख्यत: चार प्रकारचे असतात. 1)प्राकृतिक घटक 2) आर्थिक घटक 3)राजकीय घटक 4)सामाजिक घटक 1) प्राकृतिक घटक: प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक घटक. एखाद्या प्रदेशाचे स्थान, त्याची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती हे सर्व नैसर्गिक घटकात येते. स्थान म्हणजे तो प्रदेश कोठे आहे – समुद्रकिनारी की खंडाच्या अंतर्गत? प्राकृतिक रचना म्हणजे तिथे डोंगरदऱ्या आहेत, की पठारी प्रदेश आहे की मैदानी भाग आहे. तिथले हवामान उष्ण, थंड, सम-विषम कसे आहे. तिथली मृदा सकस, सुपीक आहे की रेताड, कमी प्रतीची आहे. 2) आर्थिक घटक: आर्थिक उत्पन्नाची साधने कोणती उपलब्ध असतील त्यानुसार लोकसंख्या दाट असणार की विरळ यात फरक पडतो. शेती, कारखानदारी, ही उत्पन्नाची साधने आहेत. तर नागरीकरण, बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था यामुळे आर्थिक स्थितीला चालना मिळते. 3) राजकीय घटक: एखाद्या प्रदेशात राजकीय अस्थिरता असेल, राजकीय धोरण स्थिर नसेल, सतत युद्धाची परिस्थिती असेल तर अशा ठिकाणची लोकसंख्या सुस्थिर परिस्थिती असलेल्या प्रदेशापेक्षा कधीही कमी दाट असते. 4) सामाजिक घटक: वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा हे घटकही लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. प्रस्तावना लोकसंख्या वाढ लोकसंख्येचे वितरण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक लोकसंख्येची घनता लोकसंख्येची रचना करून लिंग गुणोत्तर वयोगट प्रमाण करून पहा स्थलांतर भौगोलिक स्पष्टीकरण - स्थलांतरण भौगोलिक स्पष्टीकरण: लोकसंख्या – एक संसाधन करून पहा: महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता माहीत आहे का तुम्हांला?