लोकसंख्या

लोकसंख्येची घनता

views

4:23
मुलांनो प्रथम 2 x 2 मी. आकाराचा चौरस आखून घ्या. या चौरसात सुरूवातीला दोन मुलांना उभे करा. त्यानंतर थोड्या वेळाने चार मुले, नंतर सहा मुले, पुन्हा आठ मुले अशी दोन –दोनने संख्या वाढवीत जा. तुम्ही दोघे चौरसात होता त्यावेळी चौरसात सहज हालचाल करता येत होती का? हो, होती. नंतर चार जण, मग सहा जण झालो. त्यावेळीही आमच्या क्षेत्रात सहजपणे हालचाल करता येत होती. परंतु नंतर जसजशी मुलांची संख्या वाढत गेली. तसतशी हालचाल करायला अडचण निर्माण होऊ लागली. आता तुमचा चौरस पूर्णपणे भरला आहे अशा वेळी आणखी मुले चौरसात उभी केली तर चालतील काय? आता आणखी मुले चौरसात उभी केली तर आम्हांला व्यवस्थित उभे राहणे जमणार नाही. तुम्हांला हा प्रयोग करताना व तो पाहाताना काय वाटते ते सांगायचे आहे.