लोकसंख्या

लोकसंख्या वाढ

views

3:35
लोकसंख्या वाढ: मुलांनो, कोणत्याही प्रदेशाच्या लोकसंख्येत सतत बदल होत असतो. काही वेळेस काही कारणांमुळे लोकसंख्या कमी होते तर काही वेळेस ती वाढते. ही लोकसंख्येची होणारी वाढ किंवा घट पुढील घटकांशी संबंधित असते: हे घटक लोकसंख्येच्या वाढीवर किंवा कमी होण्यावर परिणाम करत असतात. यात प्रामुख्याने जन्मदर, मृत्यूदर, सरासरी आयुर्मान, स्थलांतर इत्यादींचा समावेश होतो. 1) जन्मदर: एखाद्या प्रदेशातील एका वर्षात दरहजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची (नवजात शिशू) संख्या त्या प्रदेशातील जन्मदर दर्शविते. म्हणजेच, त्या प्रदेशात एका वर्षामध्ये दर हजारी लोकसंख्येमागे नव्याने किती मुले जन्मास येतात ते समजते. 2) मृत्यूदर: एखादया प्रदेशातील एका वर्षाच्या कालावधीत दरहजारी लोकसंख्येमागे त्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तींची संख्या त्या प्रदेशाचा मृत्यूदर दर्शविते. 3) आयुर्मान: एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा म्हणजे ‘आयुर्मान’ होय. म्हणजेच त्या विशिष्ट प्रदेशातील व्यक्तीचा जन्म झाल्यानंतर ती किती वर्षे आपले जीवन जगू शकते, याची सरासरी म्हणजे आयुर्मान होय.