लोकसंख्या

भौगोलिक स्पष्टीकरण - स्थलांतरण

views

4:00
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्या पुन्हा वितरित होते. तसेच पहिल्या लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊन त्या प्रदेशात लोकसंख्येची नव्याने रचना होते. वरील तक्त्यात काही देशांमधील स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. ज्या देशात बाहेरच्या देशांमधून आलेल्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त असते, अशा देशांमध्ये प्रामुख्याने नोकरी व व्यवसायाच्या संधी अधिक असतात. तसेच त्या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती मोठया प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आर्थिक विकास झालेला असतो. या सर्व कारणांमुळे त्या देशांमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या जास्त असलेली दिसून येते. याउलट राजकीय स्थैर्य नसणे, दहशतवाद, आर्थिक मागासलेपण असल्येल्या प्रदेशात स्थलांतराचे प्रमाण कमी असते. मुलांनो, तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल, की भारतात मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. राजकीय व सामाजिक परिस्थितीही स्थिर आहे. तरीही आपल्या देशात स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण 0.52% एवढेच कसे? तर मुलांनो भारतासारख्या देशात स्थलांतरितांची टक्केवारी कमी असली तरी आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या जास्तच असल्याचे दिसून येते. भारताची लोकसंख्या 125 कोटींच्या आसपास आहे. मी आता तुम्हांला काही प्रश्न विचारतो त्यांची मला उत्तरे द्या. पुढील ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना काय म्हणून ओळखता ते सांगा बरं. शेत, कारखाना, हॉटेल, दवाखाना, दुकान, शाळा, कार्यालय, वीज मंडळ, बस. कोणतेही काम करण्यासाठी किमान काही शिक्षणाची व कौशल्याची आवश्यकता असतेच. शेतीसाठीही कौशल्ये लागतेच. जेवढे शिक्षण किंवा कौशल्य जास्त, तेवढा कामाचा मोबदला अधिक मिळतो.