लोकसंख्या

लिंग गुणोत्तर

views

5:09
प्रथम आपण लिंग गुणोत्तर म्हणजे काय? हे समजून घेऊ. “लोकसंख्येतील स्त्रियांचे पुरूषांच्या तुलनेत असलेले प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर होय”. हे प्रमाण दरहजारी या स्वरुपात सांगितले जाते. उदा. हरियाणाचे लिंग गुणोत्तर हजारी 879 आहे, तर केरळचे लिंग – गुणोत्तर हजारी 1084 आहे. म्हणजे दर हजार पुरूषांमागे एवढे स्त्रियांचे प्रमाण आहे. आपण पाहिले, की लोकसंख्येची वेगवेगळ्या घटकांच्या आधारे विभागणी केली जाते. इतर घटकांपेक्षा लोकसंख्येची लिंगानुसार, स्त्री आणि पुरुष अशी विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी आहे. मुलांनो, कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समान प्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शविते. हे प्रमाण समप्रमाणात असणे खूप गरजेचे असते. दरहजारी पुरूषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात. उदा. हरियाणाचे लिंग गुणोत्तर हे हजारी 879 आहे. म्हणजे हे लिंग गुणोत्तर कमी आहे. तर दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास हे लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात. उदा. केरळचे लिंग गुणोत्तर 1084 एवढे आहे. म्हणजे हे लिंग गुणोत्तर जास्त आहे. भौगोलिक स्पष्टीकरण: ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त असते. त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचे बहि:स्थलांतर जास्त असते. म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्ती समूह हे आपल्या राहत्या ठिकाणापासून दुसरीकडे गेलेली असतात. हे स्थलांतर बहुतेकदा रोजगारा निमित्त होते. उदा. केरळ राज्यातील पुरुष हे रोजगारानिमित्त मोठ्या प्रमाणात आखाती देशात व भारतात इतरत्र गेले असल्याने त्या ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते, तेथे प्रामुख्याने स्त्रियांचा जन्मदरच कमी असतो. म्हणजे स्त्री अर्भक जन्माला येण्याचे प्रमाणच कमी असते.