लोकसंख्या

महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता

views

3:52
लोकसंख्येशी संबंधित विविध घटकांची माहिती आपल्याला लोकसंख्येच्या केलेल्या प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळते. उदा. एखादया प्रदेशातील एकूण लोकसंख्या, लिंग-गुणोत्तर, वयोगटप्रमाण, साक्षरता, स्थलांतर यासर्व बाबींची माहिती लोकसंख्येच्या सर्वेक्षणातून मिळते. सर्वच देशांमध्ये असे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाला ‘जनगणना’ असे म्हणतात. आपल्या देशात हे सर्वेक्षण किंवा जनगणना दर दहा वर्षांनी नवीन दशकाच्या सुरूवातीला करतात. भारतात गेल्या दोन शतकात कुटुंबातील सदस्य संख्या कमी होत गेली हे समोरच्या चित्रावरून स्पष्ट दिसते. तरीही देशाची लोकसंख्या वाढते आहे. असे का झाले असावे? याचे कारण आपण आपल्या देशाचा विचार केल्यास आपल्याला दिसून येते की, भारतात अनेक आरोग्य सुविधा, सुधारित राहणीमान, अन्नधान्याची मुबलकता या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आजाराने, रोगाने, कुपोषणाने बळी पडणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्यामुळे आपल्या देशातील मृत्यूदर झपाटयाने कमी झाला. त्यामुळे लोकांचे आयुर्मान वाढले. खालील मुद्द्यांद्वारे लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करता येतात. 1) लोकशिक्षण – प्रत्यक्ष लोकांच्यात जाऊन लोकांना लोकसंख्या नियंत्रणाचे फायदे सांगणे. 2) शिक्षण – शालेय शिक्षणात तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमातही लोकसंख्या नियंत्रणाचे पाठ टाकून मुलांना आधीपासूनच त्याबद्दल माहिती व ज्ञान देणे. 3) जनजागृती – लोकांना रेडीओ, टीव्ही, वर्तमानपत्रे यांद्वारे छोटया कुटुंबाचे महत्त्व सांगून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे. यांसारख्या मुद्दयांद्वारे लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. आपल्या देशाच्या दृष्टीने हे खूप गरजेचे आहे.