लोकसंख्या

लोकसंख्येची रचना करून

views

3:56
लोकसंख्येचा अभ्यास करताना अजून एक घटक महत्त्वाचा असतो तो म्हणजे लोकसंख्येची रचना होय. हा मुद्दा आपण समजून घेऊ, त्यासाठी आपण पुढील कृती करूया. तुमच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या वीस व्यक्ती आठवा व त्यांची विभागणी खालील गटांत तुमच्या वहीत करा. लहान, मोठा, वयोवृद्ध, सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री, पुरुष, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार, गृहिणी इ. मुलांनो आता जी वर्गवारी केली आहे. भौगोलिक स्पष्टीकरण- लोकसंख्येची रचना: आता आपण या कृतीचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहू. लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकांत वर्गवारी करता येते. उदा. सुशिक्षित, अशिक्षित, नोकरदार, व्यापारी, बेरोजगार या उपघटकांमधील परस्पर सहसंबंधाच्या अभ्यासातून त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना व गुणवत्ता समजते. संज्ञा: लोकसंख्येच्या रचनेतील उपघटक दिले आहेत. प्रथम आपण ते उपघटक (संज्ञा) पाहू. पुरूष, कुमार, निरक्षर, बालक, बेरोजगार, शिशु, साक्षर, ग्रामीण, कार्यरत गट, नागरी, स्त्री, वृद्ध, युवक, अवलंबित गट, प्रौढ. या मुद्द्यांच्या आधारे लोकसंख्येचे उपघटक केले जातात. या उपघटकांचा व त्यांतील परस्पर-संबंधाचा अभ्यास लोकसंख्येची रचना या घटकात केला जातो.