लोकसंख्या Go Back करून पहा views 3:57 हा तक्ता पाहा: त्यात देश व त्या देशांची साक्षरता टक्केवारीत दाखविली आहे. या माहितीच्या आधारे हा स्तंभालेख तयार केला आहे. त्यावरील आकडेवारी ही 2010 सालची आहे. याचे जर आपण बारकाईने निरीक्षण केले, तर असे दिसून येईल, की विकसित देशांत साक्षरतेचा उच्च दर आहे. उदा. अर्जेंटिना, चीन, ब्राझील या देशांत साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे, तर विकसनशील देशांत साक्षरतेचा मध्यम दर आहे. उदा. भारत, बांग्लादेश. तर अविकसित देशांत साक्षरतेचा दर कमी आढळतो. उदा. पाकिस्तान, अफगाणिस्तान. भारतात 2010 साली साक्षरतेचा दर केवळ 72.1% होता. 2010 साली विकसित अशा अर्जेंटिना या देशात साक्षरतेचा दर 98.1% आणि अविकसित अशा अफगाणिस्तानमध्ये साक्षरतेचा दर 38.1% इतका होता. समोरच्या स्तंभालेखावरून लक्षात येते की; साक्षरतेचा जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असतो. साक्षरता: समाजामध्ये काही लोक साक्षर असतात तर काही निरक्षर असतात. म्हणजे ज्यांना अक्षर ओळख नसते. आपल्या देशांत जिला लिहिता वाचता येते त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते. साक्षर – निरक्षरची व्याख्या वेगवेगळया देशांत वेगवेगळया स्वरूपात असू शकते. एखादया प्रदेशातील साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते. प्रस्तावना लोकसंख्या वाढ लोकसंख्येचे वितरण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक लोकसंख्येची घनता लोकसंख्येची रचना करून लिंग गुणोत्तर वयोगट प्रमाण करून पहा स्थलांतर भौगोलिक स्पष्टीकरण - स्थलांतरण भौगोलिक स्पष्टीकरण: लोकसंख्या – एक संसाधन करून पहा: महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता माहीत आहे का तुम्हांला?