लोकसंख्या

भौगोलिक स्पष्टीकरण: लोकसंख्या – एक संसाधन

views

2:42
कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. परंतु नुसती लोकांची संख्या जास्त असून चालत नाही तर त्या लोकसंख्येत गुणवत्ता असणेही खूप गरजेचे असते. लोकांची गुणवत्ता ही साक्षरता, कुशलता, वयोगट यानुसार निश्चित केली जाते. तसेच साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट यांबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इ. गोष्टींचा विचार लोकसंख्येस साधनसंपत्ती मानताना केला जातो. लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो. या तक्त्यात आपण पाहिले की एका शहराची लोकसंख्या वाढली. पण त्या ठिकाणच्या विकासाबद्दल आपण काही सांगू शकतो का? म्हणजे एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या वाढली पण तेथील लोकांना प्यायला पाणी नसेल, राहायला घरे नसतील तर त्या वाढलेल्या लोकसंख्येचा उपयोग काय? जर अशी नुसतीच लोकसंख्येची वाढ होत असेल पण त्या प्रदेशाचा विकासच होत नसेल, तर त्या वाढीचा उपयोग काय? एखाद्या प्रदेशाचा विकास मोजायचा कसा? विकास कोणत्या आधाराने मोजला जातो? त्या प्रदेशातील किती लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. किंवा किती मुले शाळेत जाऊ लागली आहेत? किंवा कुठल्या शहरातील लोक अधिक आनंदी आहेत? कोणत्याही गोष्टीत झालेली फक्त वाढ म्हणजे विकास नव्हे! एखाद्या ठिकाणच्या लोकसंख्येचे जीवनमान, तेथील लोकसंख्येची गुणवत्ता, त्या देशातील लोकांना मिळणाऱ्या विविध संधी आणि स्वातंत्र्य यांवर त्या प्रदेशाचा विकास अवलंबून असतो. मुलांनो, मानवी विकास दर्शविणारी संकल्पना 1980 आणि 1990 च्या दशकात महबूब – अल – हक आणि अमर्त्य सेन यांनी मांडली. या त्यांच्या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास परिषद (UNDP) या संस्थेमार्फत प्रकाशित केला जातो.