लोकसंख्या

वयोगट प्रमाण

views

4:38
“एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटांनुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. उदा. कुमार, बालक, शिशु, युवक, वृदध, प्रौढ अशा वयांनुसार लोकसंख्येची रचना केली जाते, त्याला वयोगट प्रमाण म्हणतात. उदा. शिशु, बालक, कुमार व वृद्ध हे अवलंबित गटात मोडणारे घटक आहेत. तर कार्यरत गटात युवक, प्रौढ यांचा समावेश होतो. प्रदेशाच्या एकूण लोकसंख्येतील 15 वर्षांपासून 59 वर्षापर्यंतच्या वयातील लोक नोकरी, व्यवसायात गुंतलेले असतात व ते अर्थाजन करतात म्हणजे पैसे कमावितात. प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटांत वर्गीकरण केले जाते. कार्यकारी म्हणजे काम करणारे व अकार्यकारी म्हणजे काम न करणारे. जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही म्हणजेच 15 ते 59 या वयोगटातील असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत, त्यांना अकार्यकारी समजले जाते. हे अकार्यकारी गटातील लोक कार्यरत किंवा कार्यक्षम गटातील लोकांवर अवलंबून असतात. निवासस्थान: लोकांच्या निवासस्थानानुसार प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटांत केली जाते. ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात.