लोकसंख्या Go Back करून पहा: views 3:48 हा 2016 मधील विविध देशांचा मानवी विकास निर्देशांक दर्शविणारा तक्ता आहे. हा तक्ता मी तुम्हाला समजावून सांगते. या तक्त्यात सर्वात वरती, एक क्रमांकावर नॉर्वे हा देश आहे. या देशाचा मानव विकास निर्देशांकात जगात प्रथम क्रमांक लागतो. या देशाचा मानव निर्देशांक 0.949 इतका आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, युनायटेड किंग्डम, जपान या देशांचा क्रमांक लागतो. या देशांचा मानव विकास निर्देशांक 0.900 पेक्षा अधिक आढळतो. या देशांत विकासाचा अति उच्च स्तर आढळतो. तर श्रीलंका, ब्राझील, चीन या देशांत मानव विकास निर्देशांक हा 0.700 ते 0.800 यादरम्यान आढळतो. या देशांतील विकासाचा स्तर उच्च आहे. भारत, भूतान, पाकिस्तान इ. देशांत मानव विकास निर्देशांक 0.500 ते 0.600 यादरम्यान आढळतो. या देशांतील विकासाचा स्तर मध्यम आहे. तर अफगाणिस्तान, नायजेर, सेंट्रल आफ्रिका रिपब्लिक इ. देशांत मानव विकास निर्देशांक 0.300 ते 0.400 यांदरम्यान आढळतो. यादेशांत विकासाचा स्तर अतिशय कमी आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे एखादया देशाची अर्थव्यवस्था मोठी असणे किंवा त्या ठिकाणची आर्थिक परिस्थिती चांगली असणे म्हणजे त्या देशाचा मानवी विकास झाला असे नव्हे. हा विचार फक्त व्यक्तीला लागू होत नाही तर तो प्रदेश किंवा राष्ट्रालाही लागू होतो. प्रदेशाच्या विकासाचा विचार करीत असताना त्यात मानवी विकास निर्देशांक या निकषाचाही समावेश केला गेला. हा निर्देशांक ठरविताना प्रामुख्याने पुढील तीन निकष विचारात घेतले जातात. 1. आर्थिक निकष (सरासरी राहणीमान) 2. आरोग्य (अपेक्षित आयुर्मान) 3. शिक्षण (शैक्षणिक कालावधी). प्रस्तावना लोकसंख्या वाढ लोकसंख्येचे वितरण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक लोकसंख्येची घनता लोकसंख्येची रचना करून लिंग गुणोत्तर वयोगट प्रमाण करून पहा स्थलांतर भौगोलिक स्पष्टीकरण - स्थलांतरण भौगोलिक स्पष्टीकरण: लोकसंख्या – एक संसाधन करून पहा: महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता माहीत आहे का तुम्हांला?