वर्तुळ

एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे

views

03:26
एक, दोन, तीन बिंदूतून जाणारी वर्तुळे. मुलांनो, या आकृतीत एका प्रतलात बिंदू A दाखवला आहे. केंद्रबिंदू P, Q, R असणारी तीनही वर्तुळे A या बिंदूतून जातात. लक्षात घ्या की एकाच बिंदूतून आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो. आता हे पहा इथे A, B आणि C हे तीन बिंदू दिले आहेत. यातील A आणि B या दोन भिन्न बिंदूतून जाणारी अनेक वर्तुळे आपण काढू शकतो. कसे ते खालील कृतीतून समजून घेऊ.