वर्तुळ

स्पर्श वर्तुळे

views

03:48
स्पर्श वर्तुळे: मुलांनो, आता आपण स्पर्श वर्तुळे म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यासाठी कृती करा. कृती 1)X. Y. Z हे एकरेषीय बिंदू काढा. बिंदू X केंद्र मानून त्रिज्या XY एवढे अंतर घेऊन एक वर्तुळ काढा. तसेच Z हे केंद्र मानून त्रिज्या YZ घेऊन दुसरे वर्तुळ काढा. आकृती काढल्यामुळे आपल्या असे लक्षात येते की ही दोन्ही वर्तुळे Y या एकाच बिंदूत एकमेकांना छेदतात. बिंदू Y मधून रेख XZ‍ ला लंबरेषा काढा. ही लंबरेषा दोन्ही वर्तुळांची सामाईक स्पर्शिकाआहे. स्पर्शवर्तुळे नीट समजण्यासाठी आपण आणखी एक कृती करूया.