वर्तुळ

वृत्तछेदिका आणि स्पर्शिका

views

04:28
वृत्तछेदिका आणि स्पर्शिका:आता आपण वृत्तछेदिका आणि स्पर्शिका म्हणजे काय ते समजून घेऊ.मुलांनो आकृतीत दाखविल्याप्रमाणे रेषा l (एल) व केंद्रबिंदू A असलेले वर्तुळ यांच्यामध्ये एकही सामाईक बिंदू नाही. रेषा m व वर्तुळकेंद्र B असलेल्या वर्तुळात P हा एकच सामाईक बिंदू आहे. व रेषा nव वर्तुळ C केंद्र असलेल्या वर्तुळात Q व बिंदू R हे दोन सामाईक बिंदू आहेत. रेषा n ही वृत्तछेदिका आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर वर्तुळाच्या बाह्य बाजूला स्पर्श करणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते तर वर्तुळात बिंदू छेदणारी रेषा ही त्या वर्तुळाची वृत्तछेदिका असते.