वर्तुळ

वर्तुळकंस

views

04:38
वर्तुळकंस: मुलांनो, आपण मागील इयत्तेमध्ये वर्तुळकंसाविषयी माहिती घेतली आहे. आता आपण त्याचा सविस्तर अभ्यास करूया. या आकृतीत C केंद्र असलेल्या वर्तुळात k या वृत्तछेदिकेमुळे या वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. यांपैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळकंस म्हणतात. या आकृतीत k या वृत्तछेदिकेमूळे AXB व AYB हे दोन कंस तयार झाले आहेत. वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूना कंसाचे अंत्यबिंदू म्हणतात. वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळकेंद्र असते, त्या बाजूच्या कंसाला विशालकंस आणि विरुद्ध बाजूच्या कंसाला लघुकंस म्हणतात.