आम्ल, आम्लारी व क्षार

आयनिक संयुगाचे विचरण

views

02:41
आता आपण आयनिक संयुगाचे विचरण म्हणजे काय ते पाहू. पाण्यामध्ये एकापेक्षा जास्त पदार्थ विरघळत असतात. एकापेक्षा जास्त पदार्थ जेव्हा मिसळतात तेव्हा त्याला आपण मिश्रण म्हणतो. : जे पदार्थ पाण्यासोबत विरघळतात त्यांना समांगी मिश्रणे असे म्हणतात. मीठ व साखर हे दोन्ही पाण्यामध्ये विरघळतात. म्हणून पाणी व मीठ तसेच पाणी व साखर ही दोन्ही ‘समांगी मिश्रणे’ आहेत. तर जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाहीत अशा पदार्थांना विषमांगी मिश्रणे म्हणतात. तेल किंवा लाकडाचा भुसा असे जे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत त्यांना ‘विषमांगी मिश्रणे’ म्हणतात. एखादे स्थायुरूपातील आयनिक संयुग पाण्यात विरघळायला सुरवात होते, तेव्हा पाण्याचे रेणू संयुगांच्या आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. आणि त्याचे जलीय द्रावण तयार होते.