आम्ल, आम्लारी व क्षार

धातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लांची अभिक्रिया

views

03:35
आता आपण धातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लांची अभिक्रिया कशी होते ते पाहूया. धातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लांची अभिक्रिया केली तर धातूंचे क्षार व पाणी तयार होते. धातूंची ही ऑक्साइड्स आम्लारिधर्मी असतात. पाण्यात अविद्राव्य असलेल्या रेड ऑक्साइडची म्हणजेच फेरस ऑक्साइडची (Fe2O3) हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर HCl अभिक्रिया होते व पाण्यात विद्राव्य असा Fecl3 फेरिक क्लोराइड क्षार तयार होतो व पाण्याला पिवळसर असा रंग येतो. हा जो रासायनिक बदल होतो धातूंच्या ऑक्साइडची आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. धातूंची ऑक्साइडे आणि आम्लारी दोन्हीही आम्लारिधर्मी असल्याने परस्परात कोणतीही अभिक्रिया होत नाही. धातूंच्या ऑक्साइडची आम्लाबरोबर अभिक्रिया केली की धातूंचे क्षार व पाणी तयार होतात. म्हणून धातूची ऑक्साइडे ही आम्लारिधर्मी असतात.