आम्ल, आम्लारी व क्षार

आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता

views

05:27
आता आपण आम्ल व आम्लारीच्या क्रियाशीलतेविषयी माहिती घेऊ या. सर्वप्रथम आपण उदासिनीकरण म्हणजे काय त्याविषयी माहिती घेऊ. उदासिनीकरण: ज्यावेळेस आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते. त्या क्रियेला उदासिनीकरण असे म्हणतात. उदा. हायड्रोक्लोरिक आम्ल Hcl (aq)जलीय + NaOH सोडियम हायड्रॉक्साइड(aq) जलीय सोडियम क्लोराइड Nacl (aq) जलीय + H2O पाणी. सोडियम हायड्रॉक्साइडच्या NaOH द्रावणात थेंबा-थेंबाने हायड्रोक्लोरिक आम्ल HCl मिसळले असता OH- हायड्रॉक्साइड आयनांशी संयोग पावल्याने H+ हायड्रोजन आयनांची संहती कमी होत जाते व त्याचा सामू वाढत जातो. या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन आयन H+ व OH- हायड्रॉक्साइड आयनांचा एकमेव स्त्रोत म्हणजे “पाण्याचे विचरण” होय. त्यामुळेच या आभिक्रीयेला उदासिनीकरण अभिक्रिया असे म्हणतात. निळा लिटमस तांबडा करणाऱ्या पदार्थांना ‘आम्ल’ असे म्हणतात. तांबडा लिटमस निळा करणाऱ्या पदार्थांना आम्लारी असे म्हणतात.